विचार एक वाकडा...
वाकडीच डोकी
वाकडेच विचार..
वाकडी एक गोष्ट
वाकड्या माणसांची...!!!
दुभंगते मन
तुटली नाती..
मदिरेत हरवून
वाकडीच पाउले...!!!
बायकोचा छ्ळ
सासुरवास सुरू..
वर(चढ) होऊनि
मागणेच मागणे...!!!
शंका-कुशंका सुरू
चारित्र्यावर आरोप..
नुसतेच हेवेदावे
बिनबुडाचे मनोरे...!!!
सोडूनि पत्नी खुशाल
उधळतो पैसेच पैसे..
कित्येक रातराणीवर
त्याच एका गल्लीत...!!!
त्याचीच मुले
वाकडीच शिकवण..
त्याचेच संस्कार
त्याचेच अनुकरण...!!!
शिकुनी तो ही आता
झाला मोठा कसाबसा..
परस्त्री मातेसमान हे
तरुणपणी विसरूनी गेला...!!!
आजाराने खंगला
पैसा आता बिनकामी..
केवळ आक्रोश हाती
वाकड्या कर्तुत्वावर...!!!
संपुनी गेला असाच
वाकड्याच वळणात..
नाव सोडूनि पाठी
वाकड्या चालीचा
वाकड्या वळणाचा...!!!
______________________
© आदित्य अ. जाधव...!!!
______________________
तुमचे एक एक लाइक्स या पेजला
खूप महत्वाचे आहे.. विनंती अशी की..
हे पेज लाइक करण्यास नका विसरू मित्रानो...
https://www.facebook.com/AdityaAJadhav

अप्रतिम रचना आहे......
ReplyDelete