पाहतो मी आता
सताड उघड्या डोळ्यानी
माझ्या शेताकड.. ढगान दगा दिलाय;
जमीन माझी सुकून हाय
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय...
पै पै गोळा करून कसबस
पोरा बाळास्नी शिकवित हाय़;
हाउस म्हणूनशान पोरग माझ
शिनेमाला पैसा दे म्हणत हाय;
पर माझ काळीज तीळतीळ तूट्त हाय;
कस सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
शेतामंदी माझ्या गुर ती मुकी
बिचारी रोजरोज राबत हाय़;
उपाशी पोटानच त्याची रोज
सकाळ होत हाय.. रात होत हाय;
आठवून त्यांचा कडबा..
पोटात माझ्या एक सुदिल
घास जात नाय;
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
माझ्या बायकोच्या चोळीचा
एक कोना कूटतरी फाटला हाय..
नजरच मेल्या दुनियेची
किती वंगाळ वंगाळ हाय;
द्याव घिउन म्हंतु
एकादी नवीन चोळी न परकर
यावर रोजच मी टिप गाळत हाय;
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
पांडुरंगा कर बाबा काहीतरी
जीव माझा शीनला हाय;
तुझ्याच चरणात आता
पडून नाव तुझ घ्याव वाटत हाय;
किती रे देवा छळशिल या जीवा..
धड जगूपण देतनीस न मरुपण देतनीस;
टांगावा जीव त्या झाडावर म्हणून गेलो तर..
बिचार ते झाड..
भेटल एकच त्या रानावर
त्यास्नीपण एक फांदीसुदिल दिसत नाय;
कस सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
आदित्य अ. जाधव...!!!
लाइक + टॅग + शेअर
हे पेज जरूर पहा मित्रानो...!!!
https://www.facebook.com/AdityaAJadhav
सताड उघड्या डोळ्यानी
माझ्या शेताकड.. ढगान दगा दिलाय;
जमीन माझी सुकून हाय
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय...
पै पै गोळा करून कसबस
पोरा बाळास्नी शिकवित हाय़;
हाउस म्हणूनशान पोरग माझ
शिनेमाला पैसा दे म्हणत हाय;
पर माझ काळीज तीळतीळ तूट्त हाय;
कस सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
शेतामंदी माझ्या गुर ती मुकी
बिचारी रोजरोज राबत हाय़;
उपाशी पोटानच त्याची रोज
सकाळ होत हाय.. रात होत हाय;
आठवून त्यांचा कडबा..
पोटात माझ्या एक सुदिल
घास जात नाय;
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
माझ्या बायकोच्या चोळीचा
एक कोना कूटतरी फाटला हाय..
नजरच मेल्या दुनियेची
किती वंगाळ वंगाळ हाय;
द्याव घिउन म्हंतु
एकादी नवीन चोळी न परकर
यावर रोजच मी टिप गाळत हाय;
काय सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
पांडुरंगा कर बाबा काहीतरी
जीव माझा शीनला हाय;
तुझ्याच चरणात आता
पडून नाव तुझ घ्याव वाटत हाय;
किती रे देवा छळशिल या जीवा..
धड जगूपण देतनीस न मरुपण देतनीस;
टांगावा जीव त्या झाडावर म्हणून गेलो तर..
बिचार ते झाड..
भेटल एकच त्या रानावर
त्यास्नीपण एक फांदीसुदिल दिसत नाय;
कस सांगू गड्यानो..
दुष्काळ हाय
शेतात माझ्या दुष्काळ हाय;
आदित्य अ. जाधव...!!!
लाइक + टॅग + शेअर
हे पेज जरूर पहा मित्रानो...!!!
https://www.facebook.com/AdityaAJadhav
No comments:
Post a Comment