Wednesday, 9 January 2013

बाजार


बाजार...

जीवनाच्या यात्रेत; नात्यांच्या बाजारात;
थाटलेल दुकान..
हसण्याच,रडण्याच,आनंदाच,दुखा:च;
कोणी गरीब तर कोणी श्रीमंत;
भांडवल त्याचे.. मनाची उदारता,मोठेपणा;
गर्दी जमेल खरेदी सुरू होईल;
थोड आनंद; थोड दुख: हसण; थोड रडण;
खर्च त्यावरती.. थोड्या क्षणांचा, थोड्या वेळेचा;
बाजार संपेल, दुकानही उटेल;
झाली पांगापांग माणसांची;
दूर अंधारात कोणीच दिसेना;
नुसताच आवाज.. पावलांचा; वार्‍याचा;
सळसळनारा; मन हेलावणारा;
आठवण करून देत...
त्या माणसांची; त्यांच्या हळूवार नात्यांची;
त्यांच्या हसण्यांची; त्यांच्या रडण्याची;
त्या तिथेच नभांगणात; त्या काळोखात;
लक्ख करून चमकतो एक तारा तेजस्वी;
आपल्याच कुण्यातरी एका माणसाचा;
आठवण करून देत असतो,
कायम आपल्यासोबत असण्याची;
कुणाचातरी; केव्हातरी;
या नंतर कधीतरी तो मीच असेन;
परत कधीतरी तुम्हीपण असाल;
त्या तिथे दूर अंधारात; नभांगणात;
टप्याटप्याने;


© आदित्य अ. जाधव...!!!

तुमचे एक एक लाइक्स या पेजला
खूप महत्वाचे आहे.. विनंती अशी की..
हे पेज लाइक करण्यास नका विसरू मित्रानो...

No comments:

Post a Comment