Tuesday, 25 December 2012

सारे कसे आधुनिक...

सारे कसे आधुनिक...
______________________


बरबटलेल्या हातानी आपल्याच
कुणालातरी कुरवाळत होता..
आपल ते चांगल दुसर ते वाईट म्हणत 
नको तेव्हा नको त्याला झिडकारत होता...!!!

नव्हते कौतुक त्याना यशस्वितांचे
खेकड्यासम पाय खेचत होता..
आधुनिक युगाची आधुनिक ही तर्‍हा
वेगळे जो करी त्यास नाव ठेवत होता...!!!

राती अंधारात एकदा असेच कुठेतरी
फसवून तिला मज्जा मारत होता..
ना कसली खंत ना खेद मित्रानो
करूनी गर्भपात सार नामानिराळ करत होता...!!!

लोकशाहीच्या या जमान्यात आता
कोणी सावज होत तर कोणी शिकारी होता..
करूनी बलात्कार करूनी अतीप्रसंग एक तो
सुखासुखी आनंदाने हसत होता जगत होता...!!!

आदित्य अ. जाधव...!!!


लाइक + टॅग + शेअर
हे पेज जरूर पहा मित्रानो...!!!
https://www.facebook.com/AdityaAJadhav

3 comments:

  1. दोस्तहो...
    हा माझा नवीन ब्लॉग आहे..
    वेळात वेळ काढून या तुमच्या आमच्या आवडत्या ब्लॉगला... कवितेला... जरूर भेट द्या..
    ही नम्र विनंती...
    आपलाच...
    आदित्य अ. जाधव...!!!

    ReplyDelete
  2. सुरेख काव्य रचना आहे .....

    ReplyDelete