Wednesday, 26 December 2012

एक वाट अशीही...

संपूर्ण हिरव्या परिसराच्या बाजूने पसरलेला
एक काळाशार अवाढव्य नाग तो मोठा,
पाहाताना त्यास जाता येता
रोज तो थोडा विचित्रच दिसतो,
कसे का असेना पण;
येणारा हा तिथुनच येतो,
जाणारा पण तिथुनच जातो,
होणारी जडणघडण पण
त्यावरूनच तर होते,
आतुर झालेला/झालेली प्रियकर/प्रेयसी
त्यावरूनच तर जातात भेटायला एकमेकाना,
नवीन आलेला पाहुना हा येतो
घरी आपल्या हसत खेळत,
लोकांच्या गाठी भेटी घेऊन
थोडस हसवून रडवुन
जाणारा तो इथूनच तर जातो,
चालायचच..
वाटच तर आहे ती,
कधी सुरू होते न कधी संपते समजतच नाही,
आठवणींचे धागेदोरे मात्र राहतात मागे,
वाट तीच राहते.. बदलतो फक्त तो माणूस,
हीच तर आहे तुमच्या आमच्या जीवनाची
एक रुळलेली पाउलवाट,
हेच तर आहे जीवन..
तुमच्या आमच्या लक्षात राहणारे,
कुठेतरी.. कधीतरी..
चुकूनमाकुन...!!!


आदित्य अ. जाधव...!!!

लाइक + टॅग + शेअर
हे पेज जरूर पहा मित्रानो...!!!

https://www.facebook.com/AdityaAJadhav

2 comments: